रात मात्र सरली नाही

Photo by Grant McIver on Unsplash

———————————————

योगायोग झाले अनेक
भेट कधी झाली नाही
वाट पाहत सांज गेली
रात मात्र सरली नाही

उलटून गेली पहाटही
सकाळ मात्र झाली नाही
दाटून आला कंठ माझा
आठवण तिला आली नाही

उजाडलं वेशीवर जग सारं
प्रसन्न वारा वाहला नाही
हजेरी लावली नभांनी साऱ्या
सूर्य कुठे दिसला नाही

उलटून जाईल दिवसही
भान तिला होणार नाही
होता प्रेमात तिच्या जसा
प्रेमवेडा तसा पुन्हा होणार नाही

———————————————

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via