रमलो तुझ्यातच आठवणींचे घोट पिऊन  

Photo by Gahan N Rao on Unsplash

———————————————

भरले अलंकार शब्दांचे तुझ्यासाठी
तुझे वर्णन करण्यात थिटेच पडले
दिसले बहर कितीतरी साजेसे
तुझ्या सहवासासमोर रुक्षच ठरले

काय ओवावी माळ भावनांची
फुले कमी पडली आसवांची
राठ देठ राहिले मागे फक्त
साथ मागत त्या दोऱ्याची

सुन्न दिसले रात्रीचे आकाश
पाजळले चांदणे डोळ्यातून जेव्हा
लख्ख प्रकाशास मुकले आयुष्य
हिरावून घेतले क्षणरूपी चंद्र जेव्हा

झेलत सळसळता भावनाकल्लोळ
बसतो रिक्त मन मद्याने भरून
पण दूर नाही जाऊ शकलो त्या धुंदीनेही
रमलो तुझ्यातच आठवणींचे घोट पिऊन

———————————————

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via