
काही क्षण येतात अलगद जीवनात
देऊन जातात असा सुखद अनुभव
जेव्हा मिळते नजरेला नजर तेव्हा वाटते
लिहून ठेवले होते कुठेतरी आपले मिलन
योगायोग असेल दोघांचे रस्ते मिळायला
का असेल कोण्या नव्या गोष्टीचा आरंभ
राहिले आहे भेटवायचे दोन जीवांना सृष्टीवर
कदाचित विधात्याला झाली असेल आठवण
जसा होतो दोन नद्यांचा संगम
त्याचे कारण ना कोणाला उमगते
बदलतो संगम जीवनचक्र त्या नद्यांचे
प्रवाहाला त्यांच्या नवीन अर्थ देऊन
होते जसे क्षितिजावर आकाश-समंदारचे मिलन
तो योगायोग समजावा की निसर्गाचा नियम
असतात काही गोष्टी भाग्यतच लिहलेल्या
पानावर साचलेल्या दवबिंदूपेक्षाही सुंदर
उलगडेल पुढचा प्रवास कसा नाही ज्ञात
दिवस मावळला सुंदर अनुभूति देऊन
भेटलं आहे कोणीतरी आज ज्याच्यासाठी
जगायचं आहे आजपासून जगाला विसरून
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा