Tag: मिलन

Home / मिलन
यावं मी तुझ्यामागंमागं धावत असं
Post

यावं मी तुझ्यामागंमागं धावत असं

यावं मी तुझ्या मागंमागं धावत असं
राहावं मनस्वी समाजबंधनांना तोडून जसं
सुगंधित करावं मृद्गंधाने परिसराला जसं
सोडून घ्यावं रूढींच्या विळख्यातून जसं
मुक्त करावं परांपरांच्या तावडीतून जसं

कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
Post

कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर

कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
पाहताक्षणी तुला डोळ्यांत जेवढे सामावून घेतले
नसांतल्या रक्तथेंबांनी जितक्या वेळा तुझे नाव घेतले
हृदय जितक्या वेळी फक्त तुझ्यासाठी धडधडले
हयातीत फक्त तुझ्यासाठी जेवढे श्वास घेतले तेवढं

आठवते तूच मला जिथे तिथे
Post

आठवते तूच मला जिथे तिथे

आठवते तूच मला आजकाल जिथे तिथे
ओंजळीने पिंडीला जल अर्पण करताना
आवडत्या देवाला फुले वाहताना
विराम येतो जेव्हा नामजप करताना
मनात तुझे नाव आपसूकच येते

भेट आपुली पहिली
Post

भेट आपुली पहिली

छाप पाडावी अत्तराने हवेवर जशी
सहवासात सुगंधित झाल्यासारखे वाटले मला
माहित नाही काय होते चेहऱ्यावर भाव माझे
तुला पाहताच तो उजळल्यासारखे भासले मला

बांधले मी मनाचे मनोरे असे
Post

बांधले मी मनाचे मनोरे असे

धैर्य सारे एकवटून डोळ्यांत तुझ्या पाहावे
अधीर होऊन मनातले सारे बोलून टाकावे
पण नकळत झालेल्या या मनाच्या चोरीचे
आळ तुझ्यावर मी घ्यावे कसे
बांधले मी मनाचे मनोरे असे

लिहून ठेवले होते कुठेतरी आपले मिलन
Post

लिहून ठेवले होते कुठेतरी आपले मिलन

योगायोग असेल दोघांचे रस्ते मिळायला
का असेल कोण्या नव्या गोष्टीचा आरंभ
राहिले आहे भेटवायचे दोन जीवांना सृष्टीवर
कदाचित विधात्याला झाली असेल आठवण