
Photo by Harli Marten on Unsplash
——————————————–
जुळले का ऋणानुबंध कुणाशी
जुळले होते जसे माझ्याशी
लावले का सर्वस्व पणाला कुणी
जसे लावले मी तुला जिंकण्यासी
केला का अमर्याद प्रवास तुझ्यासाठी
जो मी केला परतीचा रस्ता विसरूनी
मोजले का सहवासचे क्षण कुणी
जसे जगलो मी देहभान विसरूनी
विरहवेळीची आर्तता आवाजातली
गुंजते का तुझ्या कानात आजही
दिनवाण्या माझ्या चेहऱ्याची छबी
येते का तुझ्या डोळ्यांत आजही
चांगली माणसे गमवून बसण्याची
रीत आहे का तुझ्या स्वभावाची
माझ्या दु:खाची खोली समजण्याची
तयारी आहे का तुझ्या बुद्धीची
दगा देऊन जे केलेस घाव तू
आता शक्यता नाही ते भरण्याची
कारण केले असे प्रेम मी तुझ्यावर
ज्याला सीमा नव्हती समर्पणाची
——————————————–
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा