चौकटीतले आयुष्य

Photo by Jakob Owens on Unsplash

———————————————–

बदलायचे आहे चौकटीतले आयुष्य
चार दिवसाच्या सुखासाठी वर्षभर संघर्ष
दमडी एक खोलीची अन् महालाचे स्वप्न
अजून किती दिवस असेच रेटावे हा प्रश्न

नाही कमतरता जीवनात कशाची तरीही
स्थिर नाही राहत मन एक जागी जराही
रोज जगत राहतो जुनेच दिवस नव्याने
रोज विकतो स्वप्नं पोटाच्या बहाण्याने

जीवनरूपी घड्याला आकार देतोय कोणता
लहरीनुसार दिशा बदलत भरकटतोय नुसता
विचारतो स्वत:ला भरकटल्याचा देत दुजोरा
इतक्या प्रयासानेसुद्धा का भेटत नाही किनारा

काय करायचे आहे साध्य यातून माहीत नाही
अस्तित्वाचे गणित काही केल्या उलगडत नाही
खोल गुंतलंय आयुष्य परिस्थितीच्या जाळ्यात
राहून जातंय जगणं दुनियादारीच्या कचाट्यात

———————————————–

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via