Tag: पश्चात्ताप

Home / पश्चात्ताप
चौकटीतले आयुष्य
Post

चौकटीतले आयुष्य

बदलायचे आहे चौकटीतले आयुष्य
चार दिवसाच्या सुखासाठी वर्षभर संघर्ष
दमडी एक खोलीची अन् महालाचे स्वप्न
अजून किती दिवस असेच रेटावे हा प्रश्न

आयुष्यात अनेक घाट्याचे सौदे पाहिले
Post

आयुष्यात अनेक घाट्याचे सौदे पाहिले

ध्येयामागे वेडा होऊन रणरण पळालो
कोडे यशाचे कधी ना सोडवू शकलो
शिकून सारी गणिते पुन्हा पळालो पण
कमनशिबाने पहिले पाढे पाचच राहिले
आयुष्यात अनेक घाट्याचे सौदे पाहिले

दूर केले मी पूर्वग्रह सारे
Post

दूर केले मी पूर्वग्रह सारे

दूर केले मी पूर्वग्रह सारे
कळले जेव्हा करतील आप्त दु:ख
जातो जेव्हा आपण जगाला सोडून
पण ते शिकतात जगणं आपल्याशिवाय
राहतो आपण फक्त एक विचार बनून

त्या शर्यतीतला मला ससा व्हायचं आहे
Post

त्या शर्यतीतला मला ससा व्हायचं आहे

प्रश्न पडतो एवढी ओढाताण कशासाठी
अपेक्षांचा एवढा भार वाहावा कशासाठी
शेवटी सगळं मातीतच मिळणार एके दिवशी
टाळून संघर्ष सारा मनसोक्त जगायचे आहे

दिशा आयुष्याची भरकटली जेव्हा
Post

दिशा आयुष्याची भरकटली जेव्हा

प्रयत्न कमी अन् प्रार्थना जास्त करत
नशीब उजळण्याची वाट पाहत राहिलो
हारून सर्व लढाया निर्दयी वास्तवाशी
होते नव्हते ते सर्व गमावून बसलो

तुझ्यापुढे सगळं गौण मानून जगत होतो
Post

तुझ्यापुढे सगळं गौण मानून जगत होतो

काय होतं तुझ्यात की तू एवढी प्रिय झाली
माझ्या प्रत्येक गोष्टीची नायिका तूच झाली
गेली जरी दूर मला एकटं टाकून गोष्टीअंती
माझ्यामध्ये नेहमी तुझाच अंश शोधत होतो
तुझ्यापुढे सगळं गौण मानून जगत होतो

रीत ही होऊन बसली जगण्याची
Post

रीत ही होऊन बसली जगण्याची

पाहतो रोज आरशात स्व:ताला
धारण करून मुद्रा चैतन्याची
प्रतिबिंबही हसून विचारते परत
आहे का जाण या दिखाव्याची
रीत ही होऊन बसली जगण्याची