भेटेल का कोणी किमयागार

Photo by Thomas Bormans on Unsplash

—————————————————-

लक्ष्य कुठे बाणाची दिशा कुठे
काय करावे प्रत्यंचा ताणून
अंगठा ठरतो निकामी यात
दोष असतो भटकत्या मनाचा

असते मूळ सर्वाचे मनच
नसते काही नशीब अन् दैव
घेतलेल्या निर्णयाचे परिणाम सारे
कसला योगायोग कसली आडवी मांजर

काय करावे कमी होण्यास हा त्रागा
वेळ कधी सरेल कधी होईल सुटका
फोल ठरेल आता चिंता करणे सारे
होईल आयुष्य सुतासारखे सुरळीत जेव्हा

पण पुढे सरकत नाही हा क्षण
काही केल्या सरत नाही ही गर्द छाया
भेटेल का कोणी किमयागार
जो पळवेल घड्याळाचे काटे वेगाने

—————————————————-

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via