Tag: स्वप्न

Home / स्वप्न
चौकटीतले आयुष्य
Post

चौकटीतले आयुष्य

बदलायचे आहे चौकटीतले आयुष्य
चार दिवसाच्या सुखासाठी वर्षभर संघर्ष
दमडी एक खोलीची अन् महालाचे स्वप्न
अजून किती दिवस असेच रेटावे हा प्रश्न

यावं मी तुझ्यामागंमागं धावत असं
Post

यावं मी तुझ्यामागंमागं धावत असं

यावं मी तुझ्या मागंमागं धावत असं
राहावं मनस्वी समाजबंधनांना तोडून जसं
सुगंधित करावं मृद्गंधाने परिसराला जसं
सोडून घ्यावं रूढींच्या विळख्यातून जसं
मुक्त करावं परांपरांच्या तावडीतून जसं

त्या शर्यतीतला मला ससा व्हायचं आहे
Post

त्या शर्यतीतला मला ससा व्हायचं आहे

प्रश्न पडतो एवढी ओढाताण कशासाठी
अपेक्षांचा एवढा भार वाहावा कशासाठी
शेवटी सगळं मातीतच मिळणार एके दिवशी
टाळून संघर्ष सारा मनसोक्त जगायचे आहे

करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा
Post

करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा

करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा
भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतोय
स्वाभिमान विकतोय हे माहीत असतानासुद्धा
वेळेनुसार चेहरे बदलल्याने विश्वास ठेवतोय
मूळ स्वभाव बदलत नाही माहीत असतानासुद्धा

पडत नाही बाहेर या दु:खाशिवाय काही
Post

पडत नाही बाहेर या दु:खाशिवाय काही

पडत नाही बाहेर या दुखा:शिवाय काही
पाहिले डोकावून मनाच्या डोहात कधीही
दिसतात रुतलेले काटेच डोहाच्या तळाशी
राहते जमीन कोरडीच भावनेच्या भराशी

पडतात आजही स्वप्नं मला
Post

पडतात आजही स्वप्नं मला

पडतात आजही स्वप्नं मला
फेटाळलेल्या, दुर्लक्षित केलेल्या सत्याची
भीतीपोटी टाळलेल्या अगणित कृतींची
लोकांचा विचार करून घेतलेल्या निर्णयांची
खोलवर दाबून ठेवलेल्या भावनांची