
Photo by Ethan Sykes on Unsplash
—————————————
पडत नाही बाहेर या दु:खाशिवाय काही
पाहिले डोकावून मनाच्या डोहात कधीही
दिसतात रुतलेले काटेच डोहाच्या तळाशी
राहते जमीन कोरडीच भावनेच्या भराशी
असतील त्या आठवणी कितीही सुखद
झाल्यावर वियोग वाटतात त्या दु:खद
शंका येते होते काही सत्य त्या क्षणांमध्ये
का चालू होते जगणे अनिर्बंध स्वैराचारामध्ये
केले कर्म कितीही नेकपणाचे
ना शाश्वती फळ मिळेल त्याचे
उलटतात दिवस कर्तव्यात जुंपण्यात
पण वर्षे लागतात सुखाची लहर येण्यात
बदलतील का तारे नशिबाचे विचारता
हातावरच्या रेषा का गप्प झाल्या आता
काय उपयोग मनगटातल्या बळाचा
येतो जेव्हा वारंवार दृष्टांत अपयशाचा
————————————-
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा