
Photo by Ben Tofan on Unsplash
——————————–
करून अट्टहास कितीही
वास्तव हे बदलत नाही
स्वीकारायचं म्हटलं तरी
सत्य स्वीकारलं जात नाही
निर्णय घेऊन धरलेली
वाट कधी बदलत नाही
निर्णय बदलण्याची मुभा
वाट्याला येईल असे नाही
जगण्याची रीत ही जगाची
असते ती तशीच असते
आदर्श असण्याची अपेक्षा
फक्त अपेक्षाभंग करते
लिहून ठेवले कपाळी जे
धन्य मानून पदरी घ्यावे
सर्वस्व ओतून दिले तरी
सर्व मिळेलच असे नाही
नियत साफ असली तरी
विश्वासघात होऊ शकतो
हृदय पिळवटले तरी
प्रेमभंग होऊच शकतो
——————————–
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा