रोज बसते धूळ
रोज पुसावी लागते
रोज उसवतात धागे
रोज शिवावे लागते
Tag: प्रेम
यावं मी तुझ्यामागंमागं धावत असं
यावं मी तुझ्या मागंमागं धावत असं
राहावं मनस्वी समाजबंधनांना तोडून जसं
सुगंधित करावं मृद्गंधाने परिसराला जसं
सोडून घ्यावं रूढींच्या विळख्यातून जसं
मुक्त करावं परांपरांच्या तावडीतून जसं
कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
पाहताक्षणी तुला डोळ्यांत जेवढे सामावून घेतले
नसांतल्या रक्तथेंबांनी जितक्या वेळा तुझे नाव घेतले
हृदय जितक्या वेळी फक्त तुझ्यासाठी धडधडले
हयातीत फक्त तुझ्यासाठी जेवढे श्वास घेतले तेवढं
मी अजूनही तुझ्या मुठीतच आहे
तुझ्यानंतर भेटल्या कैक व्यक्ती
बदलल्या ज्यांनी सौंदर्याच्या परिभाषा
पण जाणून घेताना त्यांना जाणवते
मी त्यांच्यात तुलाच शोधत आहे
मी अजूनही तुझ्या मुठीतच आहे
सर्वस्व अर्पण करणारा
भेटला जरी नवा राजहंस असा
तळ्यातले मासे चोचीत ठेवणारा
तरी जळतो जीव त्याचा आजही
आठवून तो सर्वस्व अर्पण करणारा
करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा
करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा
भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतोय
स्वाभिमान विकतोय हे माहीत असतानासुद्धा
वेळेनुसार चेहरे बदलल्याने विश्वास ठेवतोय
मूळ स्वभाव बदलत नाही माहीत असतानासुद्धा
भेटली जेव्हा चांदणी मला
काळ्या दगडावर सरळ
भाग्याने माझ्या रेघ ओढून
आयुष्याच्या वळणावरचा
क्षण तो अधोरेखित केला
भेटली जेव्हा चांदणी मला
निःशब्द असा राहिलो मी कसा
जमवून ठेवले होते काळजात
महासागराच्या थेंबांइतके शब्द
जाब विचारायच्या वेळी नेमका
निःशब्द असा राहिलो मी कसा
भेट आपुली पहिली
छाप पाडावी अत्तराने हवेवर जशी
सहवासात सुगंधित झाल्यासारखे वाटले मला
माहित नाही काय होते चेहऱ्यावर भाव माझे
तुला पाहताच तो उजळल्यासारखे भासले मला
निरागसता तुझी भावली मनाला
निरागसता तुझी भावली मनाला
प्रेमळ स्वभावात दिसले असे काही
निर्मात्याची काय कृपा असावी त्यावर
बनवले असेल त्याला भाग्यवान किती
ज्याच्या प्रेमात तू पडली असशील
येऊन ठेपलो त्या वेशीवर
येऊन ठेपलो त्या वेशीवर
तुझ्याकडेच घेऊन जाणारे
प्रत्येक वळण आहे जिथे
तुझ्याच दिशेने वाहणारे
सारे प्रवाह आहेत जिथे











