
Photo by Ashray Dravidian on Unsplash
—————————————-
दूर केले मी पूर्वग्रह सारे
कळले जेव्हा होते सगळे मतलबी
अपेक्षा ठेवल्याने निराशाच आली
केले जवळ आपले समजून ज्यांना
गरज सरल्यावर ना ओळख ठेवली
दूर केले मी पूर्वग्रह सारे
कळले जेव्हा नाही नांदत माणुसकी
लोभी अन् स्वार्थी माणसांच्या दारी
दाखवतात रंग सारे येताच वेळ
करुणा न नांदते त्यांच्या जिव्हारी
दूर केले मी पूर्वग्रह सारे
कळले जेव्हा अस्तित्व नाही पुरेसे
नमस्कार केला जातो उगवत्या सूर्याला
विरुद्ध दिशेने जेव्हा वाहतात वारे
शमवून टाकतात आतल्या ज्वालामुखीला
दूर केले मी पूर्वग्रह सारे
कळले जेव्हा जातात भूमिका बदलत
गोष्ट आयुष्याची जशी पुढे सरकते
नाही ओळखू शकत स्वत:ला सर्वस्वी
जोपर्यंत शेवटच्या श्वासाची वेळ येते
दूर केले मी पूर्वग्रह सारे
कळले जेव्हा होते दु:ख आपल्यांना
जातो जेव्हा आपण जगाला सोडून
पण ते शिकतात जगणं आपल्याशिवाय
राहतो आपण फक्त एक विचार बनून
—————————————-
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा