
Photo by Ravi Pinisetti on Unsplash
——————————————
येऊन ठेपलो त्या वेशीवर
देहभान विसरून येणारे
समर्पण असते जिथे
आकंठ बुडून येणारा
तळ जाणवतो जिथे
येऊन ठेपलो त्या वेशीवर
न संपणार प्रवास
सुरू होतो जिथे
झोकून देऊन स्वत:ला
अस्तित्व विसरतो जिथे
येऊन ठेपलो त्या वेशीवर
भ्रम आहे की वास्तव
न उमजावे जिथे
प्रतिबिंब का खरे चित्र
न समजावे जिथे
येऊन ठेपलो त्या वेशीवर
हद्द पाळण्याचे
नाही भान जिथे
बंधनात वागण्याची
नाही पर्वा जिथे
येऊन ठेपलो त्या वेशीवर
तुझ्याकडेच घेऊन जाणारे
प्रत्येक वळण आहे जिथे
तुझ्याच दिशेने वाहणारे
सारे प्रवाह आहेत जिथे
——————————————
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा