Tag: खंत

Home / खंत
आठवणींचे दवबिंदू
Post

आठवणींचे दवबिंदू

रात्रीसोबत सरत सरत पहाटेकडे
देहभान हरपून फक्त तुझे नाव घ्यावे
उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने ओंजळीत
तुझ्या आठवणींचे दवबिंदू साठवावे

चौकटीतले आयुष्य
Post

चौकटीतले आयुष्य

बदलायचे आहे चौकटीतले आयुष्य
चार दिवसाच्या सुखासाठी वर्षभर संघर्ष
दमडी एक खोलीची अन् महालाचे स्वप्न
अजून किती दिवस असेच रेटावे हा प्रश्न

दूर केले मी पूर्वग्रह सारे
Post

दूर केले मी पूर्वग्रह सारे

दूर केले मी पूर्वग्रह सारे
कळले जेव्हा करतील आप्त दु:ख
जातो जेव्हा आपण जगाला सोडून
पण ते शिकतात जगणं आपल्याशिवाय
राहतो आपण फक्त एक विचार बनून

त्या शर्यतीतला मला ससा व्हायचं आहे
Post

त्या शर्यतीतला मला ससा व्हायचं आहे

प्रश्न पडतो एवढी ओढाताण कशासाठी
अपेक्षांचा एवढा भार वाहावा कशासाठी
शेवटी सगळं मातीतच मिळणार एके दिवशी
टाळून संघर्ष सारा मनसोक्त जगायचे आहे

तू फक्त माझ्या भावनांचे खेळणे केले
Post

तू फक्त माझ्या भावनांचे खेळणे केले

चारचौघात माझ्या अब्रूचे धिंडोरे उडवले
मला बोटांवर नाचवण्याचे नमुने दिले
थकली नाहीस मला कधी झुकवताना
निखळ माझ्या प्रेमाचे कटपुतळे मांडले

दिशा आयुष्याची भरकटली जेव्हा
Post

दिशा आयुष्याची भरकटली जेव्हा

प्रयत्न कमी अन् प्रार्थना जास्त करत
नशीब उजळण्याची वाट पाहत राहिलो
हारून सर्व लढाया निर्दयी वास्तवाशी
होते नव्हते ते सर्व गमावून बसलो

तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना
Post

तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना

जातोय एकटाच त्या प्रत्येक ठिकाणी
आपण दुनियेपासून लपून भेटायचो जिथे
कारण आजही त्या अनमोल क्षणांचा ठेवा
भोळ्या हृदयातून काढता पाय घेता घेईना
तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना

तुझ्यापुढे सगळं गौण मानून जगत होतो
Post

तुझ्यापुढे सगळं गौण मानून जगत होतो

काय होतं तुझ्यात की तू एवढी प्रिय झाली
माझ्या प्रत्येक गोष्टीची नायिका तूच झाली
गेली जरी दूर मला एकटं टाकून गोष्टीअंती
माझ्यामध्ये नेहमी तुझाच अंश शोधत होतो
तुझ्यापुढे सगळं गौण मानून जगत होतो