
Photo by Tolga Ulkan on Unsplash
—————————————-
ओरडली झाडे उदराच्या आकांताने
पावसाची भेट काही झाली नाही
सुकून गेली वाट पाहून कधीची
वाऱ्याला काय दया आली नाही
कोणते वहाण द्यावे अनवाणी इच्छेला
जबाबदारी दरवेळी ठेच लावूनच जाते
चालतच राहावे लागते वेळेसोबत
अपूर्णतेची आग झळ लावूनच जाते
बांधला कितीही मोठा पत्त्यांचा बंगला
एक टिचकी सर्व कोलमडूनच टाकते
पसरलेले पत्ते गोळा करण्यातच
आयुष्याची गोळाबेरीज चुकून जाते
गेलो खूप पुढे चालत चांदप्रकाशात
पण रात अमावस्येची येऊनच ठेपते
रेखाटले सुंदर चित्र किनाऱ्यावर
भरतीची लाट सर्व पुसूनच टाकते
थकलो शोधताना पर्याय या तमाचा
आता प्रकाशाला साकडे घालावे म्हणते
पण दिवाच चोरून नेला या वातीने
जळण्याच्या भीतीने मी असं केले म्हणते
—————————————-
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा