
काय पटवावे माझ्या विरहाचे दु:ख
दुनियेला वाटे हे सर्व ढोंगीपणाचे
होते आतल्या आत काय माझे
काय आता काळीज काढून दाखवावे
कसे सांगू घालमेलीत वाटते कसे
पक्षांनी पंख पसरणे नाकारले जसे
माशांनी पोहायचे विसरले जसे
गोडव्याने साखरेला सोडले जसे
होतीये तीच हालत माझी आता
जसे बिंदीने माथ्याला सांगावे भरात
मी नाही सजणार तुझ्यावर यानंतर
हो या रितेपणात जगायला तयार
स्वत:ला काय सांगून धीर द्यावा
की हा विरह नशिबाचा भोग मानावा
तुम्हाला दिसतील दुरून डोंगर साजरे
पण न जाणवतील उन्हाचे पहिले चटके
येईल नवे प्रेम घेऊन माझाही ऋतू
फुटते जशी नवी पालवी वसंतात
पण या पानझडीत जगणे असते कसे
ते फक्त एका रुक्ष वृक्षालाच कळे
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा