जातोय एकटाच त्या प्रत्येक ठिकाणी
आपण दुनियेपासून लपून भेटायचो जिथे
कारण आजही त्या अनमोल क्षणांचा ठेवा
भोळ्या हृदयातून काढता पाय घेता घेईना
तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना
काय होतं तुझ्यात की तू एवढी प्रिय झाली
माझ्या प्रत्येक गोष्टीची नायिका तूच झाली
गेली जरी दूर मला एकटं टाकून गोष्टीअंती
माझ्यामध्ये नेहमी तुझाच अंश शोधत होतो
तुझ्यापुढे सगळं गौण मानून जगत होतो
परतीच्या पावसाकडे धाडला सांगावा
पाखराला घरट्याची आठवण करण्याचा
सांजवेळी निळ्या आकाशी वाट पाहताना
काही सत्य किती भयाण असू शकतात
त्या निळ्या सांजप्रहरी उमगले मला