उजळली रात जिच्या असण्याने
ती पुनवेचा चंद्र वाटत होती
आसमंतात दुमदुमेल कहाणी जिची
ती इंद्राच्या सभेतील अप्सरा वाटत होती
आज ती बिंदी लावून आली होती
Post
उजळली रात जिच्या असण्याने
ती पुनवेचा चंद्र वाटत होती
आसमंतात दुमदुमेल कहाणी जिची
ती इंद्राच्या सभेतील अप्सरा वाटत होती
आज ती बिंदी लावून आली होती
पडतात आजही स्वप्नं मला
फेटाळलेल्या, दुर्लक्षित केलेल्या सत्याची
भीतीपोटी टाळलेल्या अगणित कृतींची
लोकांचा विचार करून घेतलेल्या निर्णयांची
खोलवर दाबून ठेवलेल्या भावनांची
धैर्य सारे एकवटून डोळ्यांत तुझ्या पाहावे
अधीर होऊन मनातले सारे बोलून टाकावे
पण नकळत झालेल्या या मनाच्या चोरीचे
आळ तुझ्यावर मी घ्यावे कसे
बांधले मी मनाचे मनोरे असे
योगायोग असेल दोघांचे रस्ते मिळायला
का असेल कोण्या नव्या गोष्टीचा आरंभ
राहिले आहे भेटवायचे दोन जीवांना सृष्टीवर
कदाचित विधात्याला झाली असेल आठवण
असतेस तू जवळ जेव्हा
बोलावेसे जरी काही नसले
तरी तू जवळ असावी वाटते
बघून तुला डोळे भरून
डोळ्यात साठवावेसे वाटते
असेल गावी राव वा रंक
होता वारीत वारकरीच तो
रंगात रंगुनी हरीभक्तीच्या
होता उधळत रंग एकीचा
पाहिला असा मी सोहळा वारीचा